जालना प्रतिनिधी । आठवडाभरानंतर जालन्यात तीन नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आता एकुण बाधितांची संख्या ११ झाली आहे. नवीन रूग्णांमध्ये अंबड तालुक्यातील कानड गाव येथील दोन रूग्णांचा समावेश असून जालना तालुक्यातील जामवाडी येथील एका गर्भवतीचा समावेश असल्याची माहिती रविवारी (ता. दहा) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठाडे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात ता.१ मे पर्यंत आठ रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी दोन महिला रूग्णांचा उपचारानंतरचा अहवाल कोरोना निगेटीव्ह प्राप्त झाला. त्यामुळे एका महिलेला सुट्टी देण्यात आली आहे. तर इतर सहा रूग्णांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान रविवारी पुन्हा तीन रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यातील दोन रूग्ण हे मुंबईवरून अंबड तालुक्यातील कानडगाव येथे आले होते. तर गर्भवती महिला जालना तालुक्यातील मौजे कारला येथील असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले आहे.
पारध येथील त्या युवतीचा दुसरा अहवाल पॉझिटीव्ह
गुजरातधून आपल्या कुटुंबियासोबत पारध (ता.भोकरदन) मध्ये आलेली एक सतरा वर्षीय युवती कोरोना बाधीत आढळून आली आहे. उपचारानंतर पाठविण्यात आलेल्या तिच्या दुसऱ्या नमुन्यांचा अहवालही पॉसीटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मधुकर राठाडे यांनी दिली आहे.
जालना जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता अकरावर पोहचली आहे.आज नव्याने पॉझिटिव्ह आढळून आलेल्या तीन रुग्णांपैकी दोन अंबड तालुक्यातील कानडगाव येथील रहिवाशी आहेत ते मुंबईहुन आले असल्याचे समजते तर जामवाडी येथील मूळ रहिवाशी असलेली महिला ही जालना शहराजवळील इंडेवादी येथील असल्याचे सूत्रांनी सांगितले.