Saturday, March 25, 2023

जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करणार; फडणवीसांची घोषणा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युती सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजना महाविकास आघाडी सरकारने भ्रष्ट्राचाराचे कारण देत बंद केली होती. आता भाजप शिंदे सरकार राज्यात आल्यानंतर जलयुक्त शिवार योजना पुन्हा एकदा सुरु करणार आहे अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदाच होईल असेही त्यांनी म्हंटल.

पुण्यात कृषी विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय ‘नैसर्गिक शेती’वरील एकदिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली आपण पुन्हा एकदा जलयुक्त शिवार योजना सुरु करणार आहोत. या योजेने अंतर्गत आता प्रत्येक गाव जलस्वयंपूर्ण असेल आणि त्या पाण्याचा उपयोग गावाला होईल. या सर्वांच्या पाठीमागे नैसर्गिक शेती हेच आपण ध्येय असेल असेही ते म्हणाले.

- Advertisement -

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून रबीचे पीक जास्त घेता आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केला. या योजनेमुळे आज ३९ लाख हेक्टरवरील शेती रबीच्या पिकाकडे वळली असून, सुमारे २७ टीएमसी पाणीसाठा तयार झाल्याचा दावाही त्यांनी केला. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला असेही फडणवीस म्हणाले.