हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका चालू आहे. यांच्यातील पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकने विजय मिळवल्यानंतर इंग्लंडने जोरदार कमबॅक करत दुसऱ्या कसोटीत कर्णधार बेन स्टोक्सची शतकी खेळी अन् जेम्स अँडरसनच्या (James Anderson) ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने हि कसोटी 1 डाव 95 धावांनी अवघ्या तीन दिवसांत जिंकली. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 950 विकेट्सचा टप्पा पार केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करताना तो (James Anderson) जगातला पहिला जलदगती गोलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्ग्राथचा विक्रम मोडीत काढला आहे. ग्लेन मॅक्ग्राथने आपल्या कारकिर्दीत 949 विकेट्स घेतल्या आहेत.
इंग्लंडचा 1 डाव 95 धावांनी विजय
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 151 धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडने 9 बाद 415 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन स्टोक्सने 103 व बेन फोक्सने नाबाद 113 धावांची खेळी केली. त्यामुळेच इंग्लंडने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. यानंतर आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावासाठी मैदानात उतरला मात्र त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आणि त्यांच्या संपूर्ण संघ 179 धावांवर बाद झाला.
950 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज
अँडरसनने (James Anderson)आफ्रिकेविरुद्ध कसोटी 100 विकेट्सचा टप्पाही ओलांडला. शेन वॉर्न (130) व मुथय्या मुरलीधरन ( 104) यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो (James Anderson) तिसरा गोलंदाज ठरला. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये मुथय्या मुरलीधरन 1347 विकेट्ससह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर शेन वॉर्न (1001), अनिल कुंबळे (956) , जेम्स अँडरसन (950) व ग्लेन मॅक्ग्राथ (949) यांचा नंबर लागतो. जेम्स अँडरसन (James Anderson) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला जलदगती गोलंदाज ठरला आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय