Saturday, January 28, 2023

शोपियानमध्ये दहशतवादी-लष्करांत पुन्हा चकमक; 3 दहशतवादी ठार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – जम्मू-काश्मीरमधील शोपियान भागात दहशतवादी (terrorists) आणि सुरक्षा दलांमध्ये आज पुन्हा एकदा चकमक झाली. शोपियानच्या मुंझ भागात दहशतवादी (terrorists) आणि सुरक्षा दलांमध्ये हि चकमक झाली. या चकमकीत लष्कर या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत. या दहशतवाद्यांची (terrorists) ओळख पटवली जात असल्याचे काश्मीर झोन पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

शोपियानच्या मुंझ भागात काही दहशतवादी (terrorists) लपल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर पोलिसांसह सुरक्षा दलाच्या पथकाने तपास मोहीम सुरू केली. या सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे.

- Advertisement -

याअगोदर काही दिवसांपूर्वीही दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील वाथू शिरमल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. त्यावेळी दहशतवाद्यांचा (terrorists) शोध घेण्यासाठी सुरक्षा जवानांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली होती.

हे पण वाचा :
एकनाथ शिंदे भाई आहात ना? दाखवा भाईगिरी, नाहीतर राजीनामा द्या…; संजय राऊतांचे खुले आव्हान
पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री; शिंदेंकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख
Gold ATM : आता ATM मधून निघणार सोने; बनले देशातील पहिले सोन्याचे एटीएम
ऊठ मराठ्या ऊठ ! महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान संपविण्याचा खेळ सुरू झालाय; राऊतांचे ट्विट