लष्कर-ए-तैयबासाठी काम करणाऱ्या OGW च्या ५ जणांना अटक; जम्मू काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर । लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या OGW च्या पाच जणांना अटक करण्यात जम्मू काश्मीर पोलिसांना यश आले आहे. आज पहाटे बडगाम जिल्ह्यातील दहशतवाद्यांच्या अरिजल खानसाहब येथील अड्ड्यावर करण्यात आलेल्या कारवाईत लष्कर-ए-तैयबासाठी काम करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. झहूर वाणी असे अटक केलेल्या दहशतवाद्यांचे नाव सांगितले जात आहे. पोलिसांनी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.

या प्रकरणात चौकशीनंतर आणखी चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हे सर्वजण खानसाहब येथील रहिवासी असल्याचे समजत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले कामगार लष्कर-ए-तैयबाच्या अतिरेक्यांना मदत करत होते आणि त्यांना लपण्यासाठी जागा देत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गट गेल्या काही महिन्यांपासून येथे कार्यरत होता. तत्पूर्वी, डोडा येथे पोलिस आणि सैन्याने केलेल्या संयुक्त कारवाईत हिझबुल मुजाहिद्दीनला मदत करणारा ओव्हर ग्राऊंड कार्यकर्ता तनवीर अहमद मलिक याला अटक करण्यात आली होती

OGW काय आहे?
ओजीडब्ल्यू हा दहशतवादी संघटनांचा सहानुभूतिवादी गट आहे. ओजीडब्ल्यू चे कार्यकर्ते दहशतवाद्यांना सुरक्षा दलांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देतात. याशिवाय दहशतवाद्यांना स्थानिक मदतही दिली जाते. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या क्राइम गॅझेटनुसार ओजेडब्ल्यू हे लपलेल्या दहशतवाद्यांचे ‘डोळे आणि कान’ म्हणून काम करतात.

Leave a Comment