नवी दिल्ली । जर तुम्ही देखील जन धन खाते उघडले असेल तर आता घरबसल्या फक्त एक मिस्ड कॉल देऊन तुमचा बॅलन्स तपासू शकाल. यासोबतच, तुमच्या खात्याला आधारशी लिंक करणे देखील खूप महत्वाचे आहे. प्रधानमंत्री जन धन योजने अंतर्गत ग्राहकांना अनेक सुविधा मिळतात. हे झिरो बॅलन्स सेव्हिंग अकांऊट आहे. याशिवाय, त्यात अनेक विशेष सुविधाही उपलब्ध आहेत ज्यात ओव्हरड्राफ्ट आणि रुपे कार्डचा समावेश आहे. आज घरबसल्या तुमचा अकाउंट बॅलन्स कसा सहजपणे तपासायचा हे जाणून घ्या.
अशा प्रकारे बॅलन्स तपासा
तुम्ही तुमच्या जन धन खात्याचा बॅलन्स अशा प्रकारे तपासू शकता. यामध्ये पहिला मार्ग मिस्ड कॉलद्वारे आणि दुसरा मार्ग PFMS पोर्टलद्वारे आहे.
1. PFMS पोर्टल द्वारे
PFMS पोर्टलसाठी, तुम्हाला आधी https://pfms.nic.in/NewDefaultHome.aspx# या लिंकवर जावे लागेल. येथे तुम्हाला ‘Know Your Payment’ वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा खाते क्रमांक टाकावा लागेल. इथे तुम्हाला दोनदा अकाउंट नंबर टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड भरावा लागतो. आता तुमच्या खात्यातील बॅलन्स तुमच्या समोर दिसेल.
2. मिस्ड कॉल द्वारे
जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जन धन खाते असेल तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारे बॅलन्स तपासू शकाल. यासाठी तुम्हाला 18004253800 किंवा 1800112211 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. लक्षात ठेवा ग्राहक त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून यावर मिस्ड कॉल करू शकतात.
तुम्ही खातेही उघडू शकता
जर तुमचे जन धन खाते उघडायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जावे लागेल. येथे तुम्हाला जन धन खात्याचा फॉर्म भरावा लागेल. यामध्ये तुम्हाला तुमचे सर्व डिटेल्स भरावे लागतील. अर्ज करणाऱ्या ग्राहकाला त्याचे नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नॉमिनी, व्यवसाय/रोजगार आणि वार्षिक उत्पन्न आणि आश्रितांची संख्या, SSA कोड किंवा वॉर्ड क्रमांक, गाव कोड किंवा टाऊन कोड इ.द्यावा लागेल.
PMJDY वेबसाईटनुसार, तुम्ही पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड नंबर, निवडणूक आयोगाने जारी केलेले मतदार ओळखपत्र, राज्य सरकारच्या अधिकाऱ्याने सिग्नेचर केलेले मनरेगा जॉब कार्ड अशा कागदपत्रांद्वारे जन धन खाते उघडू शकता.