हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाबमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्यानं ते भाजपमध्ये जाणार का अशी चर्चा सुरु होती मात्र मी काँग्रेस सोडणार असलो तरी भाजपमध्ये जाणार नाही अस म्हणत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला.
अमरिंदर सिंग म्हणाले की, सध्या तरी मी काँग्रेसमध्ये आहे पण काँग्रेसमध्ये राहणार नाही. मी अशा पद्धतीचं वागणं सहन करू शकणार नाही. ५० वर्षानंतर माझ्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थिती केली जाते हे सहन होणारं नाही. ज्या पद्धतीने काँग्रेसमध्ये मला वागणूक मिळाली ती योग्य नाही. पण सध्यातरी मी भाजपामध्ये जात नाहीय अस ते म्हणाले.
अमित शहा आणि अजित डोवालांशी घेतल्या भेटीगाठी
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यामुळे नाराज अमरिंदर सिंग भाजपमध्ये जाणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र सध्या तरी आपण भाजपमध्ये जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.