व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

छगन भुजबळांचा आता व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध आहे! जरांगे पाटलांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध केल्यामुळे मनोज (Manoj Jarange Patil) जरांगे पाटील त्यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केली आहे. तसेच, “छगन भुजबळांसोबत माझे काही वाद होते. पण व्यक्ती म्हणून कधीच विरोध नव्हता. मात्र आता त्यांचा व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध आहे” अशा शब्दात जरांगे पाटील यांनी भुजबळांवर टीकास्त्र सोडलं आहे.

छगन भुजबळांवर टीका करत जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की, “आजवर छगन भुजबळांसोबत माझे काही वाद होते. पण व्यक्ती म्हणून कधीच माझा त्यांना विरोध नव्हता. मात्र आता व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध आहे. म्हातारं माणूस आहे, म्हणून मी काही बोलत नाही. पण त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला तर मग मात्र काय खरं नाही.”

तसेच, “मराठ्याची आलेली सुनामी कोणीच रोखू शकत नाही. मराठ्यांची मुलं शेतातच राहिली. आरक्षण नसल्यानं ही मुलं त्यांची स्वप्न पूर्ण करू शकली नाहीत. लेकरू अधिकारी होत नसल्यानं आई-बाप चिंतेत असतात. आम्ही नेमकं काय पाप केलं हेच कळेना. म्हणूनच आम्ही आरक्षण मिळावं, यासाठी लढा देतोय. पण याला विरोध होतोय. कितीही टक्के पडेल तरी पोर घरीच आहेत. त्यांना सध्या पोस्टवर समाधान मानावं लागत आहे” अशी खंत जरांगे पाटलांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, “ज्या कायद्यात मराठ्यांचे हित नसेल तो कायदा आम्हाला मान्य नाही. हे आंदोलन सरकारशी समेट घालायला नाही तर मराठ्यांना न्याय देण्यासाठी आहे. 24 डिसेंबर ही तारीख आपण सरकारला दिलेली नाही, ही त्यांनी आपल्याकडून मागून घेतलेली आहे. त्यामुळं आरक्षण देण्याचं काम त्यांचं आहे. त्यामुळं आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. ते आपण घेऊनच राहणार” अशी रोखठोक भूमिका मनोज जरांगे पाटलांनी मांडली आहे.