मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने विंडीजचा पराभव केला आहे. या पराभवानंतर विंडीजला आणखी एक धक्का बसला आहे. भारतासाठी त्रासदायक ठरणारा ऑलराऊंडर जेसन होल्डर (jason holder) कोरोनाची लागण झाल्यामुळे संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. सीरीज मध्ये वेस्ट इंडिजचा संघ आधीच 1-0 ने मागे पडला आहे. त्यात होल्डरची (jason holder) अनुपस्थिती त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. होल्डर (jason holder) बांगलादेश विरुद्ध झालेल्या वनडे, टी 20 आणि कसोटी मालिकेत खेळला नव्हता. तो एका मोठ्या ब्रेक नंतर संघात पुनरागमन करणार होता मात्र त्याला पुनरागमनासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे.
जेसन होल्डर न खेळणं ही भारतासाठी चांगली बातमी
जेसन होल्डर (jason holder) या सिरीजमध्ये खेळणार नाही हि बाब भारतासाठी मोठी दिलासादायक आहे. जेसन होल्डरचे भारताविरुद्ध रेकॉर्ड चांगले आहे. त्यासाठीच भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघात समावेश करण्यात आला होता. भारताविरुद्ध 25 वनडे सामन्यात त्याने 450 धावा केल्या आहेत तसंच 23 विकेट घेतल्या आहेत. वेस्ट इंडिजला या सिरीजमध्ये जेसन होल्डरची कमतरता नक्कीच जाणवेल.
जेसन होल्डर (jason holder) याआधीचा वनडे सामना याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात भारताविरुद्ध खेळला होता. 6 महिन्यानंतर तो संघात पुनरागमन करणार होता. पण असं नाही झालं. पोर्ट ऑफ स्पेन मध्ये पहिल्या वनडे सामन्यात टॉसच्यावेळी वेस्ट इंडिजचा कॅप्टन निकोलस पूरनने होल्डरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. सध्या तो आयसोलेशन मध्ये असून टीम मॅनेजमेंट त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत.
हे पण वाचा :
देवेंद्रजींवर पांडुरंग नाराज आहे का, हा एक संशोधनाचा विषय
देवेंद्रजींचे पंख छाटले गेले नाहीत, तर..; तृप्ती देसाईंची पोस्ट चर्चेत
जोखीम असूनही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याछा सल्ला तज्ज्ञ का देतात??? जाणून घ्या
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती का? शिंदे म्हणतात….
शिवसैनिकांनो, मुंबई असो वा ठाणे…; दीपाली सय्यद यांचे भावनिक पत्र