स्वघोषित तुलनाकार जयभगवान गोयल यांच्या प्रतिमेला शिवसेनेने मारले जोडे

0
41
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर | सतेज औंधकर

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या आणि नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणाऱ्या भाजप नेते जयभगवान गोयल यांच्याविरोधात कोल्हापूरात शिवसेनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. वादग्रस्त पुस्तक लिहिणाऱ्या गोयल यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन देखील यावेळी करण्यात आलं.

कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेकडून भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. या पुस्तकाच वितरण तात्काळ थांबवावं अन्यथा भाजपा हिंदुत्ववादी पक्ष आहे हे आम्हाला विसराव लागेल असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

भाजपची हेकेखोर भूमिका तशीच राहिली तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांशी केल्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाजपवर टीकेची झोड उठली आहे. भाजपच्या नेत्यांनी यावर सारवासारव करत शरद पवारांना जाणता राजा म्हटलेलं चालतं मग मोदींना का नाही असा उलटा सवाल विचारला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here