मुख्यमंत्रीपदाबाबत जयंत पाटलांचे मोठं विधान; म्हणाले सर्वानी मान्य केलंय की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्रीपद या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले होते. तत्पूर्वी जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल हे जवळपास सर्वानी मान्य केलंय असं त्यांनी म्हंटल.

कराड येथे माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले, अजित पवार, मी आणि आमच्या पक्षाचे सर्वच नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वाढवायचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचा होणार हे आता जवळपास सर्वांनी मान्य केले आहे. तेवढ्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे. त्यामुळे मला खात्री आहे कि, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल जयंत पाटील यांनी म्हंटल.

सध्या तरी राष्ट्रवादीच महाविकास आघाडीतील मोठा पक्ष

दरम्यान, महाविकास आघाडीचे पक्षीय बलाबल बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५४ आमदार, शिवसेना ५६ आणि काँग्रेसकडे ४४ आमदार होते. परंतु आता शिवसेनेमधून ४० आमदारांनी बंडखोरी केल्यांनतर ठाकरे गटाकडे अवघे १६ आमदार राहिले आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदारांची संख्या ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. हे सुद्धा तितकंच खरं आहे.