जयंत पाटलांनी केली सेना आमदाराची स्तुती ; सोशल मीडियावर राष्ट्रवादी ट्रोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी |राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत शिवसेनेच्या आमदाराची केलेली स्तुती त्यांच्या चांगलीच आंगलट आली आहे. दस्तुरखुद्द शरद पवार यांनी ज्या मतदारसंघात लक्ष घालून मतदारसंघ काबीज करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच मतदारसंघातील विद्यमान सेना आमदाराची जयंत पाटील यांनी स्तुती केली आहे.

जयंत पाटील म्हणजे मोकळे ढाकळे बोलणारे गावाकडचे माणूस. मात्र त्यांनी आटपाडी खानापूर मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांची काल विधानसभेत स्तुती केली. मंत्रीपद देण्याबाबत शिवसेनेने निष्ठावंतांचा कसा विश्वासघात केला यावर जयंत पाटील बोलत होते. आटपाडी खानापूरचे आमदार अनिल बाबर हे अत्यंत अभ्यासू आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या तालमीत घडलेले नेते आहेत. किमान अशा निष्टावंताला तरी शिवसेनेने मंत्री बनवायचे होते असे जयंत पाटील म्हणाले. मात्र त्यांच्या बोलण्याचा उद्देश हा शिवसेनेवर टीका करणे हा होता. त्यांनी अनिल बाबर यांची केलेली स्तुती त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहे. कारण त्यांनी केलेल्या स्तुतीचे व्हिडीओ सध्या शिवसैनिकांकडून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.

काँग्रेसचे सदाशिव पाटील हे आटपाडी खानापूर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा लढवण्याची शक्यता आहे. सदाशिव पाटील यांनी राष्ट्रवादीकडूनच विधानसभा लढवावी अशी गळ शरद पवार यांनीच सदाशिव पाटलांना घातली आहे. तर अशा जेष्ठ आणि वरिष्ठ पातळीच्यावर राजकारणावर विरजण टाकण्याचे काम जयंत पाटीलांचे वक्तव्य करत आहे. राष्ट्रवादीचे नेते माध्यमांच्या प्रतिनिधींना आणि राजकीय नेत्यांना ‘पोलिटिकल मॅचोरिटी’चे भान देत असतात. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष हे ‘पोलिटिकल मॅचोरिटी’पासून अनभिज्ञ आहेत का असा सवाल देखील त्यांच्या ट्रोलिंगमधून दिसून येते आहे.

Leave a Comment