व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘प्रॉमिस डे’ दिवशी जयंत पाटलांनी शरद पवारांना दिले ‘हे’ वचन; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या सोशल मीडियावर व्हेलेंटाईन वीकचा ट्रेंड सुरू आहे. आज त्यातील प्रोमिस डे असून तरुणांसोबतच राजकीय नेत्यांनाही व्हेलेंटाईन विक ची भुरळ पडली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज प्रोमिस दे दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एक प्रॉमिस दिले आहे.

आज प्रॉमिस डे! आजच्या या दिनी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि आदरणीय शरद पवार साहेबांना शब्द आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, वाडी,वस्तीपर्यंत अत्यंत मजबुतीने बांधण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे तंसंच त्याच्या खाली त्यांनी हॅशटॅग PromiseDay असंही लिहलं आहे.

दरम्यान, जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिग्गज नेतेमंडळी पैकी असून शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. मधल्या काळात अनेक जवळचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जात असताना जयंत पाटील यांनी पवारांना साथ देत त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालून राष्ट्रवादीचा प्रचार केला. जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असून ते महाविकास आघाडीतील मंत्रिमंडळात जलसंपदा मंत्री आहेत.