राष्ट्रवादीची प्रचार सभा पुन्हा भरपावसात, सातारच्या सभेची पुनरावृत्ती (Video)
पंढरपूर | पंढरपूर येथील भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भरपावसात सभा घेतली. त्यामुळे शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसातील त्या सभेची आठवण पंढरपूरकरांच्या समोर ताजी झाली.
आज पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या भगीरथ भारतनाना भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सभा घेतली. सभास्थळी वरुणराजाने हजेरी लावली. यावेळी जयंत पाटील यांनी पावसाच्या साक्षीने सभा घेतली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतलेल्या पावसातील सभेने साताऱ्यातील शरद पवार यांच्या सभेची आठवण करून दिली.
मंगळवेढ्याला जास्तीतजास्त पाणी मिळावे यासाठी भारत नाना भालके नेहमीच पाठपुरावा केला. भाजप सरकारने या मतदारसंघाचे पाणी गायब केले गेले. भारत नाना म्हणायचे मला मंत्री नका करू पण माझ्या मतदारसंघाला पाणी द्या, अशी आठवण जयंत पाटील यांनी सांगितली.