शिंदेंनी तर देशाचे पंतप्रधानच बदलले; त्या Viral Video वरून जयंत पाटलांनी घेतली फिरकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक महिला दिनानिमित्त जनतेला संभोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देशाचे पंतप्रधान म्हणून राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख करण्यात आला. सोशल मीडियावर शिंदेंचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यातच आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती करण्यात आली मात्र नियुक्तीच्या पत्रात एकनाथ खडसे यांच्या नावाऐवजी एकनाथ शिंदे या नावाचा उल्लेख आहे त्यावरून त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची फिरकी घेतली आहे.

जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद गटनेते पदी एकनाथ खडसे यांचं नाव दिले होते. मात्र १० मार्च च्या पत्रकानुसार, एकनाथ खडसे यांच्या नावाऐवजी एकनाथ शिंदे असं नाव आहे. सरकारच्या वेबसाईट वर अजूनही हेच नाव आहे. एकनाथ शिंदे यांनी तर काल देशाचे पंतप्रधानच बदलले होते. देशाच्या पंतप्रधानपदी द्रौपदी मुर्मू यांचं नाव जाहीर केलं.

Maharashtra Vidhansabha : सत्ताधारी विरोधकांच्यात जोरदार धुमश्चक्री; अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण पहा

माझ्याकडे असणारे विधिमंडळ पक्षनेतेपदाच पद सुद्धा धोक्यात आलं आहे असं वाटतंय. नागालँड मध्ये मुख्यमंत्री रिओ सगळ्या पक्षाचा पाठिंबा घेत आहेत, त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी पद्धत पाडली आहे का? ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते इच्छु होतायत का ? असा सवाल करत जयंत पाटील यांनी शिंदे यांची फिरकी घेतली.