Thursday, March 30, 2023

पुणे- बंगळूर महामार्गावर ट्रव्हल्सच्या धडकेत JCB पलटी : दोन्ही चालक गंभीर जखमी (Video)

- Advertisement -

कराड | पुणे- बंगलोर महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत JCB पलटी झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेत दोन्ही चालक गंभीर जखमी झाले आहेत. कराड शहराजवळील पाचवड फाटा येथे सदर अपघात झाला आहे. यामध्ये ट्रव्हल्सचे मोठे नुकसान झाले असून जेसीबी पलटी झाला आहे. घटनास्थळी हायवे हेल्पलाईनच्या मदतीने जखमींना तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेला निघालेल्या ट्रव्हल्सचा (NL 01 B 1571) आणि JCB (KA 23 N 2744) चा अपघात झाला. ट्रव्हल्सने जेसीबीला एवढी जोराची धडक दिली की जेसीबी पलटीच झाला. त्यामुळे ट्रव्हल्सचे मोठे नुकसान झाले. या धडकीमुळे ट्रव्हल्समध्ये झोपेत असलेले प्रवाशाच्यांत खळबळ उडाली. जोरदार आरडाअोरड झाली.

- Advertisement -

या अपघातात ट्रव्हल्सचा चालक गंभीर जखमी असून जेसीबीचा चालकही जखमी झाला आहे. यावेळी तात्काळ हायवे हेल्पलाईनचे संजय माने, दिपक नांगरे, संजोत खोत यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. तसेच प्रवाशांनाही धीर देत ट्रव्हल्समधून बाहेर काढले.