ठाकरेंनी मला मारण्यासाठी छोटा राजन- शकीलला सुपारी दिली; राणेंचा खळबळजनक आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी छोटा शकील, छोटा राजन याना सुपारी दिली होती असं म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली. आज पत्रकार परिषद घेत राणेंनी ठाकरेंवर एकामागून एक गंभीर आरोप केले.

उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहे. मनोहर जोशींच्या घरावर सदा सरवणकर याना हल्ला करण्यास उद्धव ठाकरेंनीच सांगितलं होत. नारायण राणेला मारा म्हणून छोटा शकील आणि छोटा राजनला सुपारी दिली होती. पण काय झालं? मी अजूनही जिवंत आहे असं म्हणत उद्धव ठाकरे मी तुम्हाला पुरून उरेन असा इशारा राणेंनी दिला.

उद्धव ठाकरे अपघाताने मुख्यमंत्री झाले. 2019 च्या निवडणूकीत उद्धव ठाकरे यांनी मोदींचे नाव आणि फोटो लावून निवडणूक लढली. ती जिंकली. आणि आता मोदींवर टीका सुरु केली आहे ही उपकाराची परतफेड आहे का असा सवाल राणेंनी केला. मोदी पाकिस्तानला गेले म्हणून काय झालं? आंतराष्ट्रीय संबंध काय माहित तुम्हाला असा सवालही राणेंनी केला.

मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं?? १९९२ ला महाराष्ट्रात दंगल झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी काय केलं ? कुठे होते ते? शेम्बडा माणूस, तू कधी कोणावर हात उचलू शकत नाहीस असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर एकेरी शब्दात टीका केली. उद्धव ठाकरे काय कामाचा नाही, आयत्या बिळावर नागोबा आहे असेही नारायण राणे म्हणाले.