आई बाबा मला माफ करा.., जेईई परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राजस्थानमधील कोटा (Kota) शहर नेहमीच चर्चेचा भाग राहिले आहे. याच कोटा शहरातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी जेईई परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. आत्महत्येपूर्वी या विद्यार्थिनीने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होते. ज्यामध्ये “आई आणि बाबा मला माफ करा, मी जेईईची तयारी करू शकले नाही” असे तिने म्हणले आहे.

माफ करा आई आणि बाबा…

समोर आलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव निहारिका सिंह (18 वर्ष) असे होते. ती इयत्ता बारावीत शिकत होती. सध्या ती जेईई परीक्षेचा अभ्यास करत होती. 30 जानेवारी रोजी तिची जेईई अॅडव्हानसची परीक्षा होती. परंतु परीक्षेच्या एक दिवस अगोदरच निहारिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुख्य म्हणजे, निहारिकाजवळ तिच्या कुटुंबीयांना एक नोट सापडली आहे, या नोटमध्ये ‘माफ करा आई आणि बाबा, मी जेईईची तयारी करू शकले नाही, त्यामुळेच मी आत्महत्या करत आहे. मी हरली आहे, मी चांगली मुलगी नाही’ असे निहारिकाने म्हटले आहे.

या सर्व प्रकरणाची माहिती देत एएसआय रेवतीरामन यांनी सांगितले आहे की, निहारिका सिंह हिच्या वडिलांनी म्हणजेच
बोरखेडा येथील रहिवासी विजय सिंह यांनी या आत्महत्या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विजय सिंह यांनी पोलिसांना सांगितले की, निहारिका गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तोपर्यंत उशीर झाल्याने डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. गेल्या अनेक दिवसांपासून अभ्यासामुळे निहारिका तणावाखाली असल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे आता पोलीस या जबाबाच्या आधारावर पुढील कारवाई करणार आहेत.

दरम्यान, कोचिंग क्लासेसचे शहर म्हणून राजस्थानमधील कोटाची ओळख आहे. या शहरांमध्ये नैरश्यामुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 2023 साली याचं शहरात ताणतणावातून नैराश्यातून 29 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. आता पुन्हा याच ठिकाणाहून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.