हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राजकीय वर्तुळातून नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना बिष्णोई गँगकडून(Bishnoi Gang) धमकी देण्यात आली आहे. त्याचबरोबर, धमकीदाराने लाखो रुपयांची मागणी ही केली आहे. जितेंद्र आव्हाड यांना हा धमकीचा फोन बिष्णोई गँगमधील रोहित गोदरा नावाच्या व्यक्तीने केला होता. याचं व्यक्तीने आपण ओस्ट्रेलियावरून बोलत असल्याची माहिती दिली. त्यामुळे सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत.
सलमान खानच्या घरावर गोळीबार
महत्वाचे म्हणजे, गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या बंगल्यावर बिष्णोई गँगने गोळीबार केला होता. या प्रकरणाचा तपास घेत असताना पोलिसांनी गुजरातमधून दोन जणांना अटक केली आहे. त्यानंतर आता बिष्णोई गँगकडूनच जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन करण्यात आला आहे. फोनवर बोलणाऱ्या धमकीदाराने आव्हाड यांना लाखो रुपयांची मागणी केली आहे. तसेच, हे पैसे न दिल्यास सलमान खान सारखं होईल, असेही म्हणले आहे. त्यामुळे आता बिष्णोई गँगच्या रडारावर राजकीय नेते असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलीसही तैनाब करण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला राजकीय वर्तुळात जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात सरकार आणि पोलिसांकडून नेमकी कोणती कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण की, गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेता सलमान खानच्या घरावर देखील बिष्णोई गँगकडून गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे आता महाराष्ट्रात ही गॅंग सक्रिय होत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.