जीव झाला येडा पिसा फेम विदुला चौगुले इज बिजी; मालिकेनंतर आता १२वीच्या अभ्यासात झाली मग्न

0
69
Vidula Chowgule
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एप्रिल २०२१च्या प्रारंभी कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका जीव झाला येडापिसाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर मालिकेतील सर्व कलाकार अचानक गुडूप झाले. मालिकेतील सिद्धी नामक मुख्य भूमिका साकारणारी दिसायला मोठी पण छोटीशी अभिनेत्री विदुला चौगुलेने प्रेक्षकांच्या मनावर आपले नाव कोरले आहे. मालिकेनंतर ती सध्या काय करते? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक असतात. सिद्धीची भूमिका साकारलेली कोल्हापूरकर विदुला मालिका संपल्यानंतर म्हणे खूप बिझी झाली आहे. आजकाल तिने बारावीचा अभ्यास खूपच मनावर घेतला आहे. अर्थात तो महत्वाचा आहेच. मात्र त्यासोबत विदुला फिटनेस ची देखील काळजी घेतेय.

https://www.instagram.com/p/CPQ3hNmAOln/?utm_source=ig_web_copy_link

मालिका संपल्यानंतर सारेच कलाकार आपापल्या वाटेने गेले. तशी विदुलाही आपल्या घरी गेली. मध्यंतरी मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने तिला अभ्यासासाठी वेळच मिळत नव्हता. मात्र आता प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करून झाल्यानंतर ती आता बारावीच्या अभ्यासात पुरती मग्न झाली आहे.

https://www.instagram.com/p/CPTUExogtAk/?utm_source=ig_web_copy_link

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमी वर राज्यात लॉकडाऊन आहे. याचा बऱ्याच लोकांना त्रास होत असला तरी तिच्यासाठी मात्र तो अत्यंत फायद्याचा ठरतोय. इंस्टाग्रामवर लाखोंच्या संख्येने फॉलोअर्स असलेली विदुला आता आपला पूर्ण वेळ फिटनेस आणि अभ्यासाला देतेय. इतकेच नव्हे तर ती घरातल्यांसोबत मिळालेला वेळ एन्जॉयदेखील करीत आहे.

https://www.instagram.com/p/CPBQru7gjMx/?utm_source=ig_web_copy_link

आई-वडील माझ्यावर खूपच खूश असल्याचे तिने एका माध्यमाच्या मुलाखतीत म्हटले आहे. असे असले तरी ती जीव झाला येडापिसाच्या शूटिंग टीमला खूप मिस करतेय, असेही टी म्हणाली होती. शूटिंगच्या निमित्ताने एक वेगळी फॅमिली तयार झाल्याचे सांगून तेथील सदस्यांसह कौटुंबिक आनंद घेतल्याचे तीने सांगितले. अर्थातच मालिकेच्या सेटवर अख्खा दिवस ती सर्वांसोबत वेळ घालवायची. प्रत्येकासोबत तिची अलग ओळख झाली होती गट्टी जमली होती. अनेकदा मालिकेच्या सेटवर सुरू असणारी मज्जा आणि मस्ती या मालिकेतील कलाकार इंस्टाग्रामवर शेअर करताना दिसायचे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here