अखेर जेजुरीतील अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचे अनावरण पवारांच्या हस्तेचं; होळकरांच्या वंशजांचीही हजेरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । जेजुरीतील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा वाद आज संपुष्ट आला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याचे गनिमीकाव्यानं अनावरणाचा दावा करत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर विखारी टीका केली होती. याशिवाय त्याच्या हस्ते होणाऱ्या पुतळ्याचा अनावरणाला तीव्र विरोध केला होता. याशिवाय अहिल्याबाई होळकरांचे वंशज वंशज भूषणसिंह होळकरांनी सुद्धा पवारांना विरोध दर्शविला होता. मात्र, अखेर आज शरद पवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे नियोजित अनावरण करण्यात आले.

अहिल्याबाई होळकर यांच्या जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या 12 फुटी पुतळ्याचं अनावरण गडाच्या पायथ्याशी आयोजित कार्यक्रमात करण्यात आलं.
पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह होळकर घराण्यातील वंशज यशवंतराव होळकर, खासदार छत्रपती संभाजीराजे, राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय जगताप , रोहित पवार, अशोक पवार आणि इतर नेते उपस्थित होते.

दरम्यान, अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं असल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला होता. जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा अनावरणावरुन काल पहाटे चांगलाच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पुतळ्याच्या अनावरणाला मिळालेलं वादग्रस्त वळण पाहता, जेजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.