हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio कडून स्वातंत्र्य दिनानिमित्त 750 रुपये किंमत असलेला एक प्लॅन लाँच करण्यात आला होता. यामध्ये 90 दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात आली होती. मात्र आता या प्लॅनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या प्लॅनची किंमत आता 749 रुपये केली गेली आहे. यासोबतच यामध्ये देण्यात येणाऱ्या फायद्यांमध्येही एक छोटासा बदल करण्यात आला आहे. चला तर मग या प्लॅनमध्ये नक्की काय काय बदल झाले आहेत ते जाणून घेउयात…
Jio च्या या 749 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 100 SMS/दिवस, डेली 2GB डेटा आणि Jio Applications दिले जातात. या प्लॅनची व्हॅलिडिटी 90 दिवसांची आहे. 750 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील हे सर्व फायदे देण्यात आले होते. मात्र आता यामध्ये 1 रुपयामध्ये 100MB अतिरिक्त डेटा मिळतो. हे लक्षात घ्या जिओकडून हा प्लॅन आधीच दोन भागात विभागला गेलेला होता. यातील पहिला म्हणजे 749 रुपयांचा प्लॅन आणि दुसरा 1 रुपयांचा प्लॅन,ज्यामध्ये 100MB अतिरिक्त डेटा देण्यात आला होता.
द्यावे लागतील 749 रुपये
आता Jio कडून या समीकरणातून 1 रुपयाचा प्लॅन काढून टाकण्यात आला आहे. मात्र 749 रुपयांचा प्लॅनमध्ये बाकीचे सर्व फायदे आहे आधीसारखेच दिले जातील. या प्लॅनमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहेच. Jio कडून 1.5GB डेली डेटासह 90 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला प्लॅन ऑफर केलेला नाही, त्यामुळे ज्यांना 90 दिवसांचा प्लॅन हवा असेल, त्यांना 749 रुपये मोजावे लागतील. यासोबतच त्यांना डेली 2GB डेटा देखील मिळेल.
एकूण 180GB डेटा मिळेल
यामध्ये एकूण 180GB डेटा मिळेल. तसेच 719 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांसाठी समान लाभांसह घेणार्या ग्राहकांसाठी देखील हा एक उत्तम पर्याय ठरू शकेल. यामध्ये अतिरिक्त 30 रुपये खर्च केल्यास 90-दिवसांची व्हॅलिडिटी देखील मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/
हे पण वाचा :
Car : CNG-हायब्रिड इंजिनमध्ये काय फरक आहे??? अशा प्रकारे समजून घ्या
RBI कडून ‘या’ बँकेचे लायसन्स रद्द, आता खातेदारांच्या पैशांचे काय होणार ???
Indian Bank ने सुरु केली स्पेशल FD योजना, नवीन व्याज दर पहा !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज झाली वाढ, नवीन किंमत पहा