Jio ने पुण्यामध्ये सुरु केली True-5G सर्व्हिस, आता 1Gbps च्या स्पीडने मिळणार अनलिमिटेड 5G डेटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio : देशातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओकडून वेगाने True-5G नेटवर्क रोल आउट केले जात आहे. बुधवारी Jio कडून पुण्यामध्ये 1Gbps च्या स्पीडसहीत अनलिमिटेड 5G डेटा लॉन्च केला आहे. यापूर्वी जिओने दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद आणि दिल्ली-एनसीआर भागात True-5G सर्व्हिस सुरू केली होती.

Reliance Jio 5G now available in Pune | Mint

दिल्ली-एनसीआरनंतर आता पुणे या लिस्ट मध्ये सामील झाले आहे. या True-5G सर्व्हिस जिओचे ग्राहक चांगले कव्हरेज आणि अत्याधुनिक Jio 5G नेटवर्कचा आनंद घेऊ शकतील. दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त, जिओने मुंबई, कोलकाता, वाराणसी, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू आणि नाथद्वारामध्ये आपली 5G सर्व्हिस सुरू केली आहे.

Jio 5G launch: Beta trial begins in select cities, promises of unlimited data and 1Gbps+ speed

12 शहरांमध्ये True-5G सर्व्हिस सुरू

याबाबत माहिती देताना जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, “12 शहरांमध्ये Jio True 5G सर्व्हिस सुरू केल्यानंतर मोठ्या संख्येने ग्राहकांनी Jio वेलकम ऑफरसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. ग्राहकांचा अनुभव आणि अभिप्राय लक्षात घेऊन 5G नेटवर्क तयार करण्यास मदत होईल. या अंतर्गत, शहरातील बहुतांश भागात स्टँडअलोन True-5G नेटवर्क उपलब्ध करून देण्यात आले आहे.”

Jio 5G Plans: Launch Date In India, Price, Speed, Trials And More - Gizbot News

1 Gbps पर्यंत स्पीड

टेलिकॉम कंपनीने सांगितले की,”आता पुणेकरांना अनलिमिटेड 5G डेटासहीत 1 गिगाबिट्स प्रति सेकंद (Gbps) पर्यंतचा इंटरनेट स्पीड मिळेल. True-5G नेटवर्कचा डेटा अनुभव 500 Mbps ते 1Gbps मधील कोठेही अत्यंत कमी वेगात आणि अत्यंत कमी लेटन्सीवर दिला जाईल, ज्यामुळे तो विविध ऍप्लिकेशन्सवर वापरता येईल.”

हे लक्षात घ्या कि, विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत. तसेच पुणे देशाचे आयटी हब म्हणूनही ओळखले जाते. ऑटोमोबाइल आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्येही पुण्याचे एक मोठे हब बनले आहे. बुधवारपासून सुरू झालेली जिओ वेलकम ऑफर, पुण्यातील सर्व जिओ युझर्सना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अनलिमिटेड डेटासहीत 1Gbps पर्यंत इंटरनेट स्पीडचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित करत आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-home/

हे पण वाचा :
Redmi A1 मध्ये कमी किंमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स, किंमत तपासा
PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! आता एटीएममधून काढता एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम
आता मोबाईल नंबरशिवाय अशा प्रकारे डाउनलोड करा Aadhar Card, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
FD Rates : देशातील 4 मोठ्या बँकांपैकी कोणत्या बँकेच्या FD वर सर्वोधिक व्याज मिळेल ते पहा
Train Cancelled : रेल्वेकडून 154 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा