हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio : सध्याच्या काळात टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. मात्र, अशातच आता या कंपन्या पुन्हा एकदा ग्राहकांवर भर टाकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सध्या देशातील टेलिकॉम क्षेत्रात फक्त एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडियाचे वर्चस्व आहे. या कंपन्या आता हळूहळू आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवत आहेत. तसेच जर आपण जिओचे ग्राहक असाल तर आपल्यासाठी एक वाईट बातमी आली आहे. कारण Jio कडून आपल्या एका प्लॅनची किंमत वाढवली आहे. हे लक्षात घ्या कि, जिओ ने आपल्या 199 रुपयांच्या प्लॅनची किंमत 100 रुपयांनी वाढवली आहे. मात्र, यामध्ये आधीपेक्षा थोडा जास्त डेटा देखील दिला जातो आहे.
Jio कडून आपल्या 199 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनची किंमत 299 रुपये केली आहे. मात्र, किंमत वाढवूनही हा प्लॅन इतर कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. चला तर मग आज आपण जिओच्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनच्या फायद्यांबाबत जाणून घेउयात…
Jio च्या 299 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनचे फायदे जाणून घ्या
जिओचा हा प्लॅन आता महागला आहे. यासाठी आता 299 रुपये मोजावे लागतील. किंमत वाढवण्या आधी या प्लॅनमध्ये ग्राहकांना 25GB डेटा मिळत होता, मात्र आता 299 रुपयांमध्ये एकूण 30GB डेटा मिळेल. तसेच 30 जीबी डेटा लिमिट संपल्यानंतर ग्राहकांना प्रति GB वापरासाठी 10 रुपये मोजावे लागतील. या पोस्टपेड प्लॅनमध्ये 100 एसएमएस आणि अनलिमिटेड टॉक टाईम देखील मिळतो आहे. यामध्ये ग्राहकांना JioTV, Jio Cinema, Jio Security चे फ्री सबस्क्रिप्शनही मिळते.
Airtel च्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिले जाणारे फायदे जाणून घ्या
Airtel कडे 399 रुपयांचा सर्वात बेसिक पोस्टपेड प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना 40 GB डेटा मिळतो. या प्लॅनमधील सर्वात मोठा तोटा असा कि, यामध्ये डेटा लिमिट संपल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त डेटा मिळणार नाही. याशिवाय यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/postpaid-plans-home/
हे पण वाचा :
येत्या 7 दिवसात पूर्ण करा ‘ही’ 5 महत्वाची कामे अन्यथा मिळू शकेल Income Tax ची नोटीस
Xiaomi चे स्मार्टफोन इतके स्वस्त कसे काय ??? कंपनी अशा प्रकारे वसूल करते आपला खर्च
ICICI Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 7.25% व्याज
Voter ID-आधार लिंकिंगसाठी सरकारकडून देण्यात आली मुदतवाढ
गेल्या 15 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने दिला कोट्यवधींचा नफा