Jio Recharge Plan : Jio च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनने वाढवले Airtel चं टेन्शन; रोज 2 GB डेटा अन बरंच काही…..

Jio Recharge Plan 719 rs

Jio Recharge Plan : Jio आणि Airtel या दोन्ही टेलिकॉम कंपन्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. दोघांकडेही मोठा ग्राहकवर्ग असून दोन्ही कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करताना पाहायला मिळतात. जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्या कमी पैशात वेगवेगळे रिचार्ज प्लॅन आणत असतात. आताही Jio ने असा एक रिचार्ज प्लॅन आणला असून यामुळे Airtel ची चांगलीच झोप उडाली आहे. Jio चा हा 719 रुपयांचा रिचार्ज प्लॅन असून यामध्ये नेमके कोणकोणते लाभ मिळतात ते आज आपण जाणून घेऊयात….

जिओचा 719 रुपयांचा प्लॅन- Jio Recharge Plan

जिओच्या या ७१९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटासह 84 दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात आली . या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस सुद्धा मिळतात. याशिवाय या रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओ सिक्युरिटी, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडवर मोफत ऍक्सेस देण्यात आला आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत जिओचा हा ७१९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) नक्कीच ग्राहकांना परवडणारा आहे.

एअरटेलचा 719 रुपयांचा प्लॅन

दुसरीकडे एअरटेलचा 719 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 GB इंटरनेट सुविधा मिळते. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, तसेच दररोज 100 SMS ची सुविधा देण्यात आली आहे. . या प्लॅनमध्ये यूजर्सना 84 दिवसांसाठी 5G अनलिमिटेड इंटरनेट मिळेल. तसेच, Hello Tune, Apollo 24|7, Wynk Music चे मोफत सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये उपलब्ध आहे.

आपण जर Jio आणि Airtel च्या या दोन्ही रिचार्ज प्लॅनची तुलना केली तर आपल्याला इंटरनेट डेटा मध्ये मोठा फरक दिसतोय. दोन्ही रिचार्ज प्लॅनची किंमत समान असली तरी जिओ याच किमतीत ग्राहकांना दररोज 2GB डेटा देत आहे तर दुसरीकडे एअरटेल रोज 1.5GB डेटा ग्राहकांना देत आहे. त्यांमुळे जर तुम्हाला जास्त इंटरनेटचा वापर करायचा असेल तर airtel पेक्षा Jio चा रिचार्ज प्लॅन तुम्हाला परवडेल.