लढवय्या जितेंद्र आव्हाडांना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक नेते आणि महाविकासआघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ४ दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आव्हाड यांना ठाण्यातील दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं होतं. याशिवाय सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही त्यांच्याकडून काढून घेऊन राज्यमंत्री असलेल्या दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आली होती.

मुंब्रा-कळवामधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाडांना कोरोनाची लागण झाली का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. हा पोलीस अधिकारी तब्लिगी प्रकरणाचा तपास करत असताना २१ परदेशी नागरिक, १३ बांगलादेशी आणि ८ मलेशियन नागरिकांच्या संपर्कात आला होता. मुंब्रा आणि कळव्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची चौकशी करण्यासाठी आव्हाडांनी या अधिकाऱ्याची भेट घेतली, तेव्हाच संपर्कातून विषाणू संक्रमित झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कातील १५ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं असून त्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्कातील १०० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

जितेंद्र आव्हाड यांना सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापूर्वी बच्चू कडू यांनाही कोरोनाची लक्षणं जाणवत असल्यामुळे १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. जितेंद्र आव्हाड यांच्या तब्येतीची विचारपूस उद्धव ठाकरे यांनीसुद्धा बुधवारी केली होती. राज्यातील कोरोना संकट गडद होत चाललेलं असताना सर्वांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

20200424_173909.gif