मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा शकुनीमामा असा उल्लेख करणार्या भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष पुनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे. ‘आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार’ असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंन्द्र आव्हाड यांनी महाजन यांना ‘सभ्यता सोडायला एक मिनीटही लागत नाही’ अशा शब्दात इशारा दिला आहे.
पुनम महाजन यांनी चुनाभट्टी येथे युवा महासंगम जाहिर सभेत शरद पवारांवर टिका केली होती. विरोधी पक्षांच्या महागठबंधनाला महाठगबंधन असे संबोधून शरद पवारांनाचा उल्लेख शकुनी मामा असा केला होता. यामुळे विविध स्तरातून त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती. यापार्श्वभुमीवर जितेंन्द्र आव्हाड यांनी “आपल्या वडीलांवर प्रविण महाजन यांनी का गोळ्या झाडल्या हे कदाचित जगाला माहित नसेल. पण, यामागील अंतर्गत राजकारण माहिती असलेला मी एक आहे.” असे म्हणत महाजन यांना “आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार…सभ्यता सोडायला एक मिनीटही लागत नाही” असा इशारा दिला आहे.
दरम्याद, मुंबईत महाजन यांच्या विधानाच्या निषेधार्त राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी करण्यात आली असून “अहो चिऊ ताई, महाभारत रामायन यांचे कथानक राहुद्या, देश की जनता यह जानना चाहती है? प्रविण ने प्रमोद को क्यों मारा? असा सवाल करण्यात आला आहे.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
पूनमताई महाजन… स्व. प्रमोद महाजन आणि श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे मैत्रीचे संबध आपण कसे काय विसरलात ? राजकारणातील प्रसिद्धीसाठी आपण श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल जे काही बोललात, त्याचे आम्हीही सभ्यता ओलांडून उत्तर देऊ शकतो.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 4, 2019
आपल्या वडीलांवर प्रविण महाजन यांनी का गोळ्या झाडल्या हे कदाचित जगाला माहित नसेल. पण, यामागील अंतर्गत राजकारण माहिती असलेला मी एक आहे. तेव्हा आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार… सभ्यता सोडायला एक मिनीटही लागत नाही. — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 4, 2019
इतर महत्वाचे –
इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक
रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?