हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जॉन्सनस बेबी (Johnson Baby Powder) ही पावडर लहान मुलांसाठी नेहमीच योग्य मानली गेली आहे. अनेक वर्षांपासून आईचा विश्वास कायम जपणारी ही पावडर आता मात्र आरोपांच्या पिंजऱ्यात अडकली आहे. लहान मुलांच्या त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे ज्यात जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची पावडर वापरल्यामुळे एका व्यक्तीला कॅन्सर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे न्यायालयाने कंपनीला १५४ कोटींचा दंड भरण्याचा आदेश दिला आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी लहान मुलांसाठी पावडर बनवण्यासाठी जगभर ओळखली जाते हे जगप्रसिद्ध आहे पण झालेल्या आरोपांमुळे निश्चितच त्याच्या ग्राहक वर्गात फरक पहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नेमकं काय आहे हे प्रकरण? (Johnson Baby Powder)
अमेरिकेमध्ये एंथनी हर्नांडेझ व्हॅलाडेज नावाच्या व्यक्तीने कंपनीचा पावडर वापरल्यामुळे कॅन्सर झाल्याचा आरोप केला आहे. सदर व्यक्तीने कंपनीविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे. व्हॉलडेज लहानपणापासून जॉन्सन बेबी पावडरचा वापर करीत होता, या पावडरमुळेच त्याला छातीजवळ मेसोथेलीयोमा नावाचा कॅन्सर झाला. पीडित व्यक्तीला सुमारे दोन वर्षे कंपनी विरुद्ध लढा द्यावा लागला व यानंतर त्याचा विजय होत न्यायालयाने कंपनीला १५४ कोटी रुपयांचा दंड भरण्याचा आदेश दिला.
सदर आरोपावर कंपनीचे स्पष्टीकरण काय?
कंपनीच्या म्हणण्यानुसार जॉन्सन बेबी ही पावडर (Johnson Baby Powder) पूर्णपणे सुरक्षित आहे कारण ती विशेष पांढऱ्या बाटल्या मध्ये पॅक करून विकली जाते. अशा प्रकारची सुरक्षितता बाळगल्यानंतर कंपनीमुळे कोणालाही कॅन्सर किंवा इतर रोग होऊ शकत नाहीत.
कंपनी विरूद्ध नोंदविण्यात आला होता २०२० मध्ये गुन्हा
या आधीही जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या (Johnson Baby Powder) विरोधात काही प्रकरणे समोर आली होती ज्यामुळे कंपनीला नुकसान भरपाई देखील द्यावी लागली. विक्रीत घट झाल्याचे कारण देत अशा उत्पादनांना कंपनीने बाजारातून काढून टाकले होते. कंपनीने २०२० मध्ये अमेरिका आणि कॅनडा येथे पावडरची विक्री थांबवली होती. या पावडरमध्ये एक हानिकारक फायबर आढळून आला होता जो कर्करोगास कारण मानला जातो. यामुळे ३५ हजार महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर झाल्यामुळे कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. यावेळी कंपनीला १५००० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. यानंतर अमेरिका आणि कॅनडामध्ये बेबी पावडरची विक्री कमी झाल्याच्या कारणास्तव पावडरचे विक्री थांबवण्यात आली तरीही ब्रिटनसह जगातील इतर देशांमध्ये त्याचे विक्री सुरू आहे.