भारतातील कोरोनाचा मृत्यू दर जगातील देशांच्या तुलनेत सर्वात कमी- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतातील कोरोनामुळे मृत्यू पावण्याचा दर हा जगातील देशांच्या तुलनेत सर्वात कमी असून हे आपल्याला लॉकडाउन, चाचण्या आणि रुग्णांना वेळेवर देण्यात आलेल्या उपचारांमुळे साध्य झाले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले आहे. एकूण लोकसंख्येच्या दर १ लाखामागे ०.३ टक्के इतकाच मृत्यूदर राखण्यात भारताला यश आले आहे. मात्र, दुसरीकडे जगातील देशांचा सरासरी मृत्यूदर हा ४.४ टक्के इतका आहे असं अग्रवाल यांनी सांगितले.

जगातील काही देशांमध्ये दर एक लाख लोकसंख्येमागे ८१.२ इतक्या मृत्यूंची नोंद झाल्याचेही ते म्हणाले. हे आपल्याला लॉकडाउन, चाचण्या आणि रुग्णांना वेळेवर देण्यात आलेल्या उपचारांमुळे साध्य झाल्याचे अग्रवाल म्हणाले. लॉकडाउन, कंटेनमेंट आणि नियमांमुळे आपल्याला करोनाच्या संसर्गाची साखली तोडता आली असेही ते पुढे म्हणाले. करोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचेही दिसत नसल्याचे ते म्हणाले.

भारतातील कोरोना संसर्गाची स्थिती सुधारच असून जगाच्या तुलनेत मृत्यूचा दरही कमी असल्याचे अग्रवाल यांनी यापूर्वीही सांगितले होते. आतापर्यंत देशातील एकूण रुग्णांपैकी ६० हजार ४९० रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत. तसेच रग्ण बरे होण्याच्या दरातही सुधारणा झाली असून सध्या हा दर ४१.६१ इतका आहे. देशातील मृत्यूदर जगाच्या तुलनेत सर्वांत कमी आहे आणि सध्या तो २.८७ टक्के इतका असल्याचेही अग्रवाल म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment