सोलापूर प्रतिनिधी । भारताच्या राजकारणात जरी मी सिंधिया असलो तरी महाराष्ट्राच्या राजकारणात मी शिंदेच आहे. असं मत मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केलं. आज सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी त्यांची सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी बहीण प्रणिती शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन केलं.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातून ज्योतिरादित्य यांच्या प्रचार दौऱ्याला प्रारंभ झाला. तेथून त्यांनी लातूर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा अमित देशमुख यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. आणि लातूरहून विमानान ते सोलापूरला आले.
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या व विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापूरात ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रचारसभा झाली. त्यानंतर, ते पुण्यात येणार आहेत. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या पुणे कँन्टोन्मेट मतदारसंघात गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजता त्यांची सभा होणार आहे.