जुही चावलाला आली होती महाभारतातील द्रौपदीच्या भुमिकेची ऑफर, पण…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन दरम्यान अनेक जुने टीव्ही शोज् दूरदर्शनवर पुन्हा रिलीज झाले आहेत.त्यापैकी ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ला सर्वाधिक पसंत केले जात आहेत.दरम्यान,आम्ही या आवडत्या धार्मिक कार्यक्रमांशी आणि त्यांच्या कलाकारांशी संबंधित काही मनोरंजक कथा आम्ही सतत आपल्यासाठी घेऊन येत आहोत.त्याचबरोबर आम्ही तुम्हाला नुकत्याच जबरदस्त चर्चेत असलेल्या ‘महाभारत’च्या कलाकारांशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत. ‘महाभारत’ मधील द्रौपदीच्या व्यक्तिरेखेसाठी अभिनेत्री रूपा गांगुली ही पहिली पसंती नव्हती, तर अभिनेत्री जुही चावला ही होती. परंतु ही भूमिका तिने एका विशिष्ट कारणास्तव नाकारली.

Mahabharat: From Juhi Chawla being offered Draupadi's role to ...

‘महाभारत’ मध्ये द्रौपदीची व्यक्तिरेखा अभिनेत्री रूपा गांगुलीने साकारली होती पण त्यापूर्वी ही भूमिका जूही चावलाला ऑफर केली गेली होती.टेलीचक्कर यांनी दिलेल्या वृत्तानुसार, जूही चावलाने ही द्रौपदीची भूमिका नाकारली होती.याचे कारणदेखील खूप खास होते.या वृत्तानुसार,त्यावेळी जुही चावलाला महाभारताबरोबरच आमिर खानसमवेतच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाची ऑफर होती.यापैकी जूहीने हा चित्रपट निवडला आणि महाभारतातली द्रौपदीची भूमिका नाकारली गेली.

त्याच वेळी,जेव्हा जूहीने ही भूमिका नाकारली,तेव्हा ही भूमिका अभिनेत्री रूपा गांगुलीकडे गेली आणि तिने फक्त होकार दिला नाही, तर तिच्या शानदार अभिनयातून तिने द्रौपदीच्या प्रत्येक सीनमध्ये जीव ओतला.हे कठीण पात्र साकारून तिने सगळयांची वाहवा मिळवली. मात्र,नंतर तिने अभिनयाच्या जगाला निरोप दिला आणि आता तिला एक राजकारणी म्हणून ओळखले जाते आहे.’महाभारत’ बद्दल बोलायचे तर,पूर्वीच्या काळातली क्रेझ आजही कायम आहे. लॉकडाऊन दरम्यान हा शो पुन्हा रिलीझ झाला आहे तेव्हा लोक या शोशी संबंधित त्यांच्या जुन्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. रामायणाप्रमाणे दूरदर्शनवर परत आलेल्या महाभारतानेही प्रचंड टीआरपी मिळवला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment