निर्दयी! नवजात मुलीचा जन्मदात्या आईनेच गळा आवळून केला खून

सांगली । आपल्या नवजात मुलीचा आईनेच गळा आवळल्याची हद्यद्रावक घटना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात घडली. याप्रकरणी सुमित्रा गंगाप्पा जुट्टी (वय ३०, रा. यलापूर जि. बेळगाव) असे त्या निर्दयी आईचे नाव असून तिच्यावर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील सुमित्रा प्रसुतीसाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. शनिवारी तिने एका मुलीला जन्म दिला. यानंतर शनिवारी रात्री तिने मुलीचा गळा आवळला. ही घटना पाहणाऱ्या त्याच वार्डातील दुसऱ्या महिलेने याची माहिती डॉक्टरांना दिली होती.

त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांनी त्या नवजात मुलीवर तातडीने उपचार सुरु केले होते. उपचारादरम्यान, तिचा मृत्यू झाला. तिच्या गळ्यावर गळा आवळल्याच्या खूणा दिसून येत होत्या. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने विश्रामबाग पोलिसात याबाबत फिर्याद देत निर्दयी आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”