व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा परिषद शाळेतील गरीब मुलांच्या आयुष्याशी खेळू नका, अन्यथा..; रासपच्या कालिदास गाढवेंचा प्रशासनाला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राष्ट्रीय समाज पक्षाच्या कालिदास पोपट गाढवे यांनी आटपाडीच्या पंचायत समितीस जिल्ह्या परिषदेच्या शाळांची गुणवत्ता सुधारणेबाबत व रिक्त पदे भरणेबाबत निवेदन दिले आहे. याशिवाय त्यांनी जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गरीब मुलांच्या आयुष्याशी खेळू नका असा कडक आणि तीव्र इशारा प्रशासनाला दिला आहे.

या विषयास अनुसरून त्यांनी एक निवेदन दिले आहे. यात लिहिलंय कि, आपल्या तालुक्यात कायम स्वरुपी गटशिक्षण अधिकारी नसून प्रभारी आहेत. कायम स्वरूपी गटशिक्षण अधिकारी मिळावा. तसेच केंद्र प्रमुखांची 14 पदे असून केवळ 2 भरलेले आहेत. गौरगरिबांची मुले मुली ZP शाळेत शिकत असून रिक्त पदांमुळे ZP शाळांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. गोरगरीब मुलांच्या भवितव्याशी खेळून त्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये प्रशासनाच्या अशा भोंगळ कारभारामुळे विद्यार्थी पालक यांच्या मनामध्ये प्रशासनाबद्दल नकारात्मकता निर्माण झाली आहे.

यामुळे ZP शाळा व इतर सर्वच शासकीय शाळेमधील विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे. अशामुळे बरेच पालक आपली मुले खाजगी शिक्षण संस्थामध्ये घालत आहेत. परंतु गरीब सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांचे यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. तरी आपण यावर त्वरित कार्यवाही करावी अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.