लव्ह्गुरू | प्राचीन काळात लिहिलेले ‘कामसूत्र’ हे स्त्री आणि पुरुषाच्या नात्याला दृढ करण्यासाठी पूर्वी पासूनच फार महत्वाची भूमिका बजावीत आलेले आहे. कामसूत्र म्हंटले की बऱ्याच जणांच्या डोक्यात फक्त सेक्स लाईफ बद्दल चे सूत्र असलेले एखादे गद्य असा विचार येतो. परंतु कामसूत्र हे फक्त सेक्स लाईफ बद्दलच मार्गदर्शन न करता यात स्त्री आणि पुरुषांच्या एकंदरीत नात्यातला गोडवा कसा टिकविला जावू शकतो या बद्दल केलेले मार्गदर्शन आहे.
जाणून घेऊयात कसे करतात पुरुष स्त्रियांना आकर्षित
१) कामसूत्रानुसार विद्वत्ता तो गुण आहे जो पुरुषामध्ये असायला पाहिजे. असे गुण असणारे पुरुष महिलांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरतात.
२) कामसूत्रानुसार जे पुरुष महत्त्वाकांक्षी आणि उत्साही असतात त्यांच्याकडे स्त्रिया लवकर आकर्षित होतात.
३) ज्या पुरुषांमध्ये विश्वास आणि दुसर्यांची भावना समजण्याचा गुण असतो ते स्त्रियांना आकर्षित करण्यास यशस्वी ठरतो.
४) कामसूत्रानुसार ज्या पुरुषांमध्ये कविता किंवा गोष्ट ऐकवण्याची आणि वर्णन करण्याची योग्यता असते त्यांच्याकडे स्त्रिया लवकर आकर्षित होतात.
५) कामसूत्रात उल्लेख करण्यात आलेल्या सूत्रांनुसार साहसी आणि शूरवीर पुरुष नेहमी महिलांना आकर्षित करण्यास यशस्वी ठरतात.
इतर महत्वाचे –
हस्तमैथुन करण्याचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?