सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांनो औकातीत राहुन बोला; कंगनाकडून ट्रोलर्सला सक्त ताकीद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच आपल्या स्पष्ट आणि परखड मतांसाठी ओळखली जाते. नुसती ओळखली जात नाही तर तिच्या वक्तव्यांमुळे ती बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात येते. मग काय सोशल मीडियावर नेटकरी तिला चांगलेच ट्रोल करताना दिसतात. कंगनाची ट्विटर अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर ती इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय दिसतंय. मुद्दा कोणताही असो, लोक तिला कितीपण ट्रोल करत असतील पण गप्प बसेल ती कंगना कुठली. नुकताच तिने इस्त्रायल प्रकरणावर भाष्य करणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यानंतर तिला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यानंतर आता कंगनाने देखील या ट्रोलर्सला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

 

कंगनाने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती इस्रायल- पॅलेस्टाईनमध्ये अनेक वर्षांपासून काय सुरू आहे, याबाबत बोलताना दिसतेय. यावरून तिला प्रचंड ट्रोल केले गेले. त्यानंतर कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर ज्यांनी तिला ट्रोल केले, त्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. तिने लिहिले, ‘इस्त्राईल कसा बनला हे आपण व्हिडीओमध्ये स्पष्टपणे पाहू शकता. त्यांनी ते इंग्रजांकडून काढून घेतले आणि संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाच्या सहाय्याने ते तयार केले. त्यानंतर त्याच्यावर ६ मुस्लिम राष्ट्रांनी हल्ला केला. त्यानंतर ते त्यांच्यावर सातत्याने हल्ले करून ताब्यात घेत आहेत. कारण जेव्हा आपण युद्ध जिंकता तेव्हाच असे होते.’

https://www.instagram.com/tv/CO2ateDB87t/?utm_source=ig_web_copy_link

ती पुढे म्हणाली की, जर आपण तर्कशास्त्रानुसार विचार करत असू, तर भारतात फक्त हिंदू असावेत. अमेरिकेत रेड इंडियन आणि ऑस्ट्रेलियामध्ये आदिवासी असावेत. ज्यू बेकायदेशीर लोकांच्या या जगात आपण कोठेही राहण्यास योग्य नाही. संपूर्ण जगाला मूर्ख बनवून ठेवले आहे. यांना गुंडगिरी करायची आहे. संपूर्ण जगात ही वृत्ती डोके वर काढत आहे आणि खोटा मीडिया आणि वेदे लोक चुकीचा अर्थ लावण्यासाठी याचा वापर करत आहेत.’ आणि जे इथे रडून मला सांगण्याचा प्रयत्न करतायत कि मला काहीच माहित नाही. तर बेटा मी त्या सगळ्या बापांची आई आहे. त्यामुळे औकातीत राहून बोलत जा. अश्या पद्धतीने ट्रोलर्सला थेट ताकीद देत कंगनाने चांगलीच शाळा घेतली आहे.

Leave a Comment