हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं अस वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. तसेच कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे, त्यावरून कंगणाने इंस्टाग्राम पोस्ट करत टीकाकरांच्या वर निशाणा साधला आहे.
कंगना म्हणली, त्या मुलाखतीत सगळ्या गोष्ट मी स्पष्टपणे म्हटल्या. १८५७ मध्ये स्वातंत्र्यासाठी पहिला संघटित संघर्ष झाला. सोबत सुभाष चंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकरांनी बलिदानावरही भाष्य केलं. १९८७ बद्दल मला माहीत आहे. पण १९४७ मध्ये कोणता लढा देण्यात आला त्याची मला माहिती नाही. जर कोणी माझ्या माहितीत भर घातली, तर मी पद्मश्री पुरस्कार परत करून माफी मागेन.
मी राणी लक्ष्मीबाई सारख्या शहिदाच्या आयुष्यावर आधारित फीचर फिल्ममध्ये काम केलं आहे. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामावर बरंच संशोधन केलं. राष्ट्रवादासोबतच दक्षिणपंथाचाही उदय झाला. मग हा अचानक तो संपुष्टात कसा आला? गांधींनी भगतसिंगांना का मरू दिलं? नेता बोस यांची हत्या का झाली? असा सवाल कंगनाने केला