हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या सतत करण्यात येणाऱ्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहिली आहे. तसेच तिने आजवर सामाजिक विषयांवर आणि राजकीय विषयांवर देखील आपले मत मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळे कंगना रनौत यंदा लोकसभा निवडणूक लढेल अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. आता या चर्चांवर शिक्कामोर्तब झाला आहे. कारण स्वतः कंगनाचे वडील अमरदीप रणावत यांनी कंगना 2024 लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच कांगणा राणावतने कुल्लू येथील आपल्या घरी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीनंतरच कंगना निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. या संदर्भात अमरदीप रनौत यांना विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, “कंगना भाजपच्या तिकिटावरच निवडणूक लढवेल. मात्र ती कोणत्या जागेवरुन लढेल हे पक्षच ठरवेल” त्यामुळे आता कंगना निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कंगना रनौत राजकीय क्षेत्रात सक्रिय होताना दिसत आहे. कारण काही आठवड्यांपूर्वीच हिमाचल मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिने संघाचे विचारधारा माझ्या विचारांशी जुळती आहे असे म्हटले होते. अशा अनेक कारणांमुळे करणार भाजपच्याच बाजूने उभे राहील हे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी कंगनाने भाजप पक्षाविषयी देखील अनेक वेळा सकारात्मक वक्तव्य केली आहेत. तसेच आजवर तिने भाजपच्या अनेक धोरणांना पाठिंबा दर्शवला आहे.