…तर गोडसे मुर्दाबाद बोलून दाखवा; कन्हैय्या कुमारचे भर कार्यक्रमात राम कदमांना आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. देशभक्तीच्या मुद्द्यावरून अनेक कार्यक्रमात त्यांनी भाजप नेत्यांच्या तोंडचं पाणी देखील पळवलं आहे. अशातच एका कार्यक्रमात भाजप आमदार राम कदम आणि कन्हैय्या कुमार आमने सामने आपल्याचं पहायला मिळालं आहे. यावेळी भारत माता की जय’ म्हणून दाखवा म्हणणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांना काँग्रेस नेता कन्हैय्या कुमारने स्टेजवरच ‘गोडसे मुर्दाबाद’ बोलण्याचं आव्हान दिलं आणि यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली

चर्चा सुरू असताना राम कदम यांनी कन्हैय्याच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली आणि भारत माता की जय म्हणून दाखवा, असं राम कदम म्हणाले. त्यावेळी कन्हैय्याने रोखठोक उत्तर दिलं आहे. तुम्ही माझ्यामधला बिहारी जागा केला आहे. आतापर्यंत मी तुमच्याशी आदराने बोलत होतो. आम्ही भारत माता की जय बोलतो, पण तुम्ही गांधींना मानत असाल तर गोडसे मुर्दाबाद बोलून दाखवा, असं आव्हान कन्हैय्याने दिलं.

यावर राम कदम यांनी आम्ही गोडसेच्या कार्याचं आम्ही कधी समर्थन केलं आहे का? असा प्रश्न विचारला. यावर कन्हैय्या कुमारने केलं आहे असं उत्तर देत आरएसएसच्या कार्यालयात गोडसेचा फोटो लावला आहे, ग्वालियरमध्ये मंदिर उभारलं आहे असं सांगितलं.

राम कदम पुढे बोलताना म्हणाले की, “तुम्ही गोडसे मुर्दाबाद बोला असं सांगत आहात, पण आम्ही गोडसे जिंदाबाद असं कधी म्हटलं?. गांधींच्या विचारसऱणीचा अपमान आम्ही कधी केला असा सवाल करत त्यांनी गोडसे मुरदाबाद म्हणणे टाळले.