ICC U19 World Cup:कपिल आणि अझरचा बीसीसीआयला घरचा आहेर म्हणाले,वर्ल्ड कप फायनलमध्ये दोषी असलेल्या खेळाडूंवर करा कारवाई…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीम इंडियाचे दोन माजी कर्णधार कपिल देव आणि मोहम्मद अझरुद्दीन आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनल नंतरच्या ‘वागणुकी’मुळे प्रचंड निराश झाले आहेत. अंतिम सामन्यात भारतीय संघातील खेळाडू बांगलादेशच्या १९ वर्षांखालील संघातील खेळाडूंना भिडले. रविवारी केनवेस पार्क येथे झालेल्या अंतिम सामन्यात बंगलादेशने डकवर्थ लुई नियमानुसार भारताला तीन विकेट्सनी पराभूत केले.यानंतर दोन्ही संघांमध्ये वाकयुद्ध जुंपले. द हिंदुने कपिलच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, “मला वाटते की बीसीसीआय ने या खेळाडूंविरूद्ध कठोर पावले उचलण्याची गरज आहे. क्रिकेटचा अर्थ विरोधी संघाचा अवमान करणे नाही.मला खात्री आहे की बीसीसीआयकडे लवकरच याविषयीची पाऊले उचलतील. “

विश्वविजेता कर्णधार म्हणाला, “मी आक्रमकतेचे स्वागत करतो, यात काहीही चूक नाही परंतु त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. स्पर्धात्मक होण्यासाठी आपण सीमा ओलांडू शकत नाही. तरुण खेळाडूंचे अशा पद्धतीने वागणे मला मान्य नाही, असे ते म्हणाले.यासंबंधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने तीन बांगलादेशी आणि तर दोन भारतीय खेळाडूंना निलंबित केले आहे.बांगलादेशच्या तौहीद ह्रीदॉय, शमीम हुसेन, रकीबुल हसन आणि भारतकडून आकाश सिंग आणि रवी बिश्नोई यांची नावे आहेत. शिक्षाही झाली आहे

कपिलच्या मुद्यावर अझरनेही सहमती दर्शविली आहे. ते म्हणाले, “मला १९ वर्षांखालील संघातील खेळाडूंविरूद्ध कारवाई करायची आहे, परंतु या तरुणांना शिकविण्यात सहाय्य करणार्‍या कर्मचार्‍यांची यात काय भूमिका होती हे मला देखील जाणून घ्यायचे आहे. उशीर होण्यापूर्वीच पावले उचलणे आवश्यक आहे. या खेळाडूंना शिस्त बध्ध्द रहावं लागेल. “

 

Leave a Comment