मागील पाच वर्षे तुम्ही झोपला होता का?; ओबीसी आरक्षणावरून शरद पवारांची भाजपवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट भाजप व केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ओबीसी समाजाची पुन्हा जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. एकदा देशाला कळू द्या की, ओबीसींची संख्या किती आहे. अशी मागणी करत महाविकास आघाडी सरकारवर ओबीसी समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. आम्ही फसवणूक केली तर मग मागच्या पाच वर्षात तुम्ही झोपला होतात का? असा सवाल पवार यांनी भाजपला केला.

मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी समाजातील बांधवांचा मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पवार म्हणाले की, आज ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यांवरून सरकारवर निशाणा साधला जात आहे. ओबीसी समाजाच्या लोकसंख्येबाबत प्रश्न चिन्हही उपस्थित केले जात आहेत.

आज ओबीसी जनगणनेची मागणी केली जात आहे. होऊ द्या मग जनगणना. एकदा देशाला कळू द्या की किती ओबीसी संख्या किती आहे. आपण आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय शांत राहणार नाही, ओबीसींच्या हक्कासाठी ज्या गोष्टी करता येतील त्या नक्की करणार आहे.

वास्तविक सर्वांकडून ओबीसी समाजाची जनगणना करण्याची मागणी केली जात आहे. मात्र केंद्रातील सरकारच ओबीसींची जनगणना होऊ देत नाही. संघाचे भैय्याजी जोशी यांनी ओबीसी जनगणना मान्य नसल्याचे सांगितले होते. ओबीसी जनगणना झाल्यास त्याने देशात अस्वस्था निर्माण होईल असे त्यांनी म्हटले होते. ओबीसींच्या जनगणनेनुसार काही सत्य समोर येईल, असेही पवार यांनी सांगितले.

मग भाजपने काय केलं?

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू आहे. त्याचा समाचारही पवार यांनी आपल्या भाषणात घेतला. भाजप नेते सांगतात महविकास आघडी सरकारने धोका दिला आहे. मग माझा सवाल आहे मागच्या पाच वर्षात तुम्ही झोपला होतात का? असा उलट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Leave a Comment