“गांधी कुटुंबाने पक्षाच्या नेतृत्वापासून बाजूला व्हावे”; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पार पाडल्या. या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची आत्मपरिक्षण बैठक घेतली. या बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सोनिया गांधी यांच्या व काँग्रेसबाबत महत्वाचे विधान केले आहे. “गांधी कुटुंबाने काँग्रेसच्या नेतृत्वापासून बाजूला व्हावे आणि इतर एखाद्या व्यक्तीला संधी द्यावी,” असे सिब्बल यांनी म्हणत हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि गांधी घराण्याबाबत अनेक महत्वाची विधाने केली. यावेळी ते म्हणाले की, नुकतीच काँग्रेस पक्षाच्यावतीने विचारमंथन करण्यासंदर्भात बैठक घेतली. पक्षाचं नेतृत्व हे फार संकुचित विचार करत आहे. त्यांना मागील आठ वर्षांमध्ये पक्षाची पडझड का होतेय याची कारण ठाऊक नाही.

“काँग्रेसला आघामी काळात पुढे घेऊन जायचे असेल तर सोनिया गांधींनी स्वेच्छेने बाजूला व्हावे. कारण त्यांनी नियुक्त केलेलं मंडळातील लोक कधीच त्यांना तुम्ही नेतृत्व सोडा असे सांगणार नाही. देशभरामध्ये काँग्रेसचे अनेक नेते आहेत. केरळ, आसाम, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरातमधील काँग्रेस नेत्यांची वेगळी मतं आहेत,” असे सिब्बल यांनी म्हंटले.

Leave a Comment