कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राष्ट्रीय आय काँग्रेसने सोनिया गांधी यांना ईडी चाैकशीसाठी बोलविण्यात आल्याने युवक काॅंग्रेसने मोर्चा काढून आंदोलन केले. या आंदोलनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केले. पंतप्रधान पद हे घटनात्मक व संविधानिक आहे, याची जाणीव नसल्याने अशा अवैचारिक आंदोलकांनी पंतप्रधान यांच्या पुतळ्याचे दहन केले आहे. तरी या आंदोलकांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कराड भाजपाकडून करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी कराड शहरच्या वतीने कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांना युवक काॅंग्रेसच्या आंदोलकांवर कारवाईसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश सदस्य विक्रमजी पावसकर, कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी, नगरसेवक घनश्याम पेंढारकर ,उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी,विवेक भासले ,सरचिटणीस प्रमोद शिंदे, धनंजय खोत, अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष नितीन शहा, अल्पसंख्यांक युवा मोर्चा प्रदेशचे उपाध्यक्ष, कामगार आघाडीचे अध्यक्ष विश्वनाथ फुटाणे, नितीन वास्के , धनंजय खोत, रुपेंद्र कदम, कृष्णा चौगुले, शैलेंद्र गोंदकर, शंकर पाटील, विवेक भोसले, कराड उत्तर महिला आघाडी नम्रता कुलकर्णी, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कराड येथे दि. 26 रोजी काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने चाैकशीसाठी बोलावले होते. यावेळी दिल्लीत राहूल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या घटनेचा निषेध करण्यासाठी युवक काॅंग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचा पुतळा दहन केला होता. याविरोधात कराड येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.