लग्नाच्या गुणोमिलनात 32 गुण जुळलेल्या नवदाम्पत्यांला 12 वी परिक्षेतही समान गुण

0
54
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गणेवाडी येथील अधिक कदम व सांगवड येथील किरण सुर्यवंशी यांचा लव्ह अरेंज मॅरेज मे महिन्यात लॉकडाऊन मध्ये पार पडला. त्या अगोदर दोघांनीही बारावी परिक्षा दिली होती. किरण हिने कॉर्मस  तर अधिक यांनी आर्टस मधून परिक्षा दिली. अधिक हा पदवीधर असुन   किरणला  प्रोत्साहन मिळावे यासाठी  त्यांने बारावीची परिक्षा दिली होती. 12 वी च्या निकाला मध्ये दोघांनाही  650 पैकी 323 मार्क मिळाले. दोघांची टक्के वारी ही 49.69 अशी समान आली आहे.

परिक्षे अगोदर लग्नाला दोघांच्या घरच्यांचं विरोध होता. तेव्हा निराश मनस्थितीत दोघेही अभ्यास करत होते. अशा परिस्थितीत हे दोघे ऐकमेकांना माझ्यापेक्षा तुला जास्त मार्क मिळतील अशी आशा व्यक्त करत होते. मात्र प्रत्यक्षात निकाल समान आल्याने  दोघांनाही सुखद धक्का बसला आहे. हे महिन्यात लॉकडाऊन मध्ये दोघांचे लग्न घरच्यांच्या संमतीने साध्या पध्दतीने पार पडला लग्नाचे गुणोमिलनात दोघांचे  23 गुण जुळले होते. लग्नात गुण जुळले परिक्षेत जुळले आता वैवाहिक जीवनातही सर्व स्वप्न आवडी निवडी जुळाव्यात ही अपेक्षा किरण व अधिक या नवदाम्पत्यांनी  व्यकत केली आहे.

बारावी परिक्षेत मुलीला कमी गुण मिळालेने नाराज होतो मात्र लेक व  जावाई यांचे समान गुणांचा योगायोग पाहून समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया मुलीच्या वडीलांनी दिली आहे. गुणोमिलनाचे गुण , परिक्षेतील मार्क हा आकड्यांचा खेळ असला तरी नवजीवनाची सुरुवात करणाऱ्या नवदाम्पत्याला हे जुळलेले गुण आयुष्यभर उर्जा देण्यास पुरेसे ठरतील हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here