काय! डासांमुळेही पसरतोय कोरोना ? संशोधनातून समोर आली ‘ही’ माहिती; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या संसर्गाबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न उद्भवत आहेत. अर्थात या विषाणूबद्दल जगभरात बर्‍याच ठिकाणी संशोधन देखील चालू आहे. त्यामुळे त्याबद्दल सतत नवीन माहिती समोर येते. गेल्या कित्येक महिन्यांपासून लोक विचारत आहेत की, डास चावल्यामुळे देखील एकमेकांमध्ये कोरोनाचा संसर्ग होतो ? आता संशोधनात असे दिसून आले आहे की, डास चावल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका नाही आहे. मात्र, यावर्षी मार्चमध्ये जागतिक आरोग्य संघटनेनेही हेच सांगितले.

संशोधनात आणखी काय सापडले?
अमेरिकेच्या कॅन्सस युनिव्हर्सिटीने डासांवर याबाबत संशोधन केले. त्यांच्या अहवालानुसार कोरोना पसरणारा SARS-CoV-2 हा विषाणू डासांच्या चावण्याद्वारे पसरु शकत नाही. एडीज एजिप्टी, एडीज अल्बोपिक्टस आणि कुलेक्स क्विंफॅसिअस या तीन प्रजातींवर शास्त्रज्ञांनी संशोधन केले. हे तिन्ही प्रकारचे डास चीनमध्ये आहेत आणि कोरोनाची सुरुवात ही चीनपासूनच झाली होती.

कोरोनावर हवामानाचा कोणताही परिणाम होत नाही
कोविड -१९ हा विषाणू गरम आणि दमट वातावरणासह सर्व भागात पसरतो. डब्ल्यूएचओने याबाबतीत म्हटले आहे की, आपण कुठेही गेलात तरी संरक्षणात्मक उपाय घ्या. कोविड -१९ ला टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपले हात वारंवार स्वच्छ करणे. असे केल्याने आपण आपल्या हातावरील संक्रमण दूर करू शकता आणि ते टाळू शकता. डब्ल्यूएचओने असेही म्हटले आहे की, थंड हवामानाचा कोरोना विषाणूशी काहीही संबंध नाही. हा लोकांचा एक समज आहे की हवामान नवीन कोरोना विषाणू किंवा इतर रोगांचा नाश करू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment