कराड | कराड शहरात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून एका मोटार सायकल चोर संशयितास ताब्यात घेण्यात आले होते. अजित भगवान खरात (वय- 19 वर्षे, रा. लेंगरेवाडी पो. मारूगडे ता.आटपाडी जि.सांगली, सध्या रा. उजाला चौकी,सरकेज अहमदाबाद राज्य गुजरात) असे संशयिताचे नाव आहे. सदरील इसम कराड बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतल्यानंतर त्याने 16 मोटार सायकर चोरी केल्याचे कबूल केल्याची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर पो. ठाणे हद्दीत व परिसरात मोटार सायकल चोरांचा शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार संतोष सपाटे व नितीन येळवे हे पेट्रोलिंग करत होते. यावेळी मिळालेल्या माहितीवरून एकास ताब्यात घेतले असता त्याने चोरीची कबुली दिली. त्यास गुन्हे प्रकटीकरण शाखेत आणून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमित बाबर यांनी कौलशल्यपुर्ण तपास केला असता. त्याने एकुण 16 मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले. त्या त्याचेकडून जप्त करणेत आलेल्या आहेत. आरोपीत याने कराड शहरातून 07, विटा जिल्हा सांगली येथून 03, कासा जिल्हा पालघर येथून 01 तसेच अहमदाबाद राज्य गुजरात येथून 05 अशा एकुण 5 लाख 58 हजार रुपये किंमतीच्या 16 मोटार सायकल चोरल्याचे निष्पन्न झालेले आहे.
नमुद गुन्ह्याच्या तपासामध्ये नमुद आरोपीत हा एस. टी. बसने वेगवेगळया शहरात जावून बसस्थानक परिसरात लोकांनी पार्क केलेल्या स्प्लेंडर, एचफ डिलक्स व शाईन मोटार सायकल अशा गाड्या टार्गेट करून त्यांचेकडील मास्टर की ने हॅण्डल लॉक काढून चालु करत होता. गाडीची नंबर प्लेट काढून ग्राहक शोधून कोरोनामुळे पेपर ट्रान्स्फर होण्यास वेळ लागत आहे, असे सांगून गाड्याची विक्री करत होता. गाड्या चोरून विकून मिळालेल्या पैशातून मौजमजा करत होता.
पोलीस अधीक्षक सातारा अजयकुमार बन्सल यांनी सुचननेनुसार व अपर पोलीस अधीक्षक सातारा अजीत बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड डॉ. रणजीत पाटील व वरिष्ठ पेालीस निरीक्षक बी. आर. पाटील, कराड शहर पो. ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख अमित बाबर, सहा.पोलीस निरीक्षक कराड शहर पो. ठाणे, पोउपनि अशोक भापकर, सफौ संतोष सपाटे, सतीश जाधव, पोलीस हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे, मनोज शिंदे पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, संदीप कुंभार, मारुती लाटणे, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे यांनी केलेली आहे.