सकलेन मुलाणी । कराड
कराड:- माजी सहकारमंत्री, सप्तपदी आमदारकी पाहिलेले व बाजार समिती, खरेदी- विक्री संघसह सर्व तालुक्यातील संस्थावर वर्चस्व गाजविणारे कराड दक्षिणचे राजकीय पितामह विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या निधनाने तालुक्यातील बाजारपेठ, सहकारी संस्थांनी बंद ठेवण्यात आल्या आहेत.
माजी सहकारमंत्री विलासराव पाटील- उंडाळकर यांचे सातारा येथे पहाटे पाच वाजता निधन झाल्याची बातमी समजताच कराड तालुक्यातील अनेक सहकारी संस्था, स्थानिक संस्था, बाजार समिती, खरेदी- विक्री संघ, बैलबाजार, भाजीपाला मार्केट, पेट्रोल पंप, कोयना दूध संघ यांनी बंद पाळला आहे. तर कराड- उंडाळे मार्गावरील सर्वच दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली आहेत.
मंत्री उंडाळकर यांच्या अत्यंदर्शनासाठी कार्यकर्त्यांची गर्दी होणार असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे. कराड शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीत माजी मंत्री विलासराव पाटील यांचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी ठेवले जाणार असल्याने तेथे कार्यकर्त्यांनी तयारी केली असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. त्यामुळे बाजारपेठा, सहकारी संस्थांच्या कार्यालयात व परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’