कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जंतुनाशक औषध फवारणी करण्याच्या मुद्यावरून नगराध्याक्षा, नगरसेवक आणि अधिकारी यांच्यातील वादामुळे नागरिक वेठीस धरले जात होते. त्यातच यशवंत विकास व लोकशाही आघाडी यांच्यासह मुख्याधिकारी यांनी नगराध्याक्षांना टार्गेट केले होते. मात्र मंगळवारी नागरिकांच्या हितासाठी नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांनी थेट पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेवून शहरात स्वतः फिरून औषध फवारणी करून घेतली. तेव्हा आता नगराध्यांक्षांना टार्गेट करणारे कुठे गेले असा सवाल नागरिकांच्यातून उपस्थित केला जात होता.
नगराध्यांक्षा रोहीणी शिंदे यांच्यावर अनेकदा मुख्याधिकारी व विरोधी नगरसेवकांनी शहरांच्या विकासासाठी काम करत नसल्याचा आरोप केला जात आहे. तर नगराध्यांही मला टार्गेट करण्याचे काम मुख्याधिकांऱ्यासह काही नगरसेवकांकडून केले जात आहे. मात्र शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे असताना, पालिकेतील या गोंधळामुळे नागरिक कोरोना सारख्या माहामारीत वाऱ्यावर सोडला गेला होता. अशावेळी मंगळवारी (दि. १४) नगराध्यांक्षा स्वतः पालिकेच्या अग्निशामक गाडी सोबत कर्मचारी घेवून कोल्हापूर नाका परिसरातून जंतुनाशक औषध फवारणी केली. अग्निशामक गाडीतून जंतुनाशक औषध फवारणी चालू असताना नगराध्यांक्षा स्वतः हजर असल्याने नागरिकांनी त्यांना हात उंचावून धन्यवाद दिले. नगराध्यांक्षा रोहीणी शिंदे यांनीही हात उंचावून नागरिकांचे आभार मानले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग बरोबर प्रशासनाने सांगितलेल्या सूचनाचे पालन करावे, असे सांगत संवाद साधला.
शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे मी माझे कर्तव्य समजते. सध्याचा काळ अत्यंत वाईट आहे. कोणावर आरोप करण्यापेक्षा लोकांच्या समस्या सोडवण्यास मी प्राधान्य देत आहे. कोणतेच काम थांबत नसते, ती करण्याची तयारी असावी लागते. मुद्दाम अशा संकटकाळातही घाणेरडे राजकारण करण्याचा प्रकार केला जात आहे, त्यांचा मी निषेध करते असे म्हणत माझे काम कराडवासियांसाठी चालूच राहिल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवला.