कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड नगपरिषदेचे 2021- 2022 सालातील 134 कोटी 79 लाख 20 हजार रूपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सत्ताधारी जनशक्ती विकास आघाडीने सूचविलेल्या उपसूचना स्विकारून अर्थसंकल्प बहुमताने मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्पातील सूचना मांडल्यानंतर सभागृहात जनशक्ती, भाजप यांच्यात गदारोळ मांडला होता. नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
कोरोना पार्श्वभूमीवर आजची सभा यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टॉऊन हॉल) येथे घेण्यात आली. सन 2021-2022 सालच्या अर्थसंकल्पात आरंभीच्या शिल्लकेसह जमेच्या बाजूस 72 कोटी 11 लाख 35 हजार रूपये व खर्चाच्या बाजूस 55 कोटी 99 लाख 66 हजार 920 रूपये दर्शविण्यात आले आहेत. भांडवली अर्थसंकल्पात आरंभीच्या शिल्लकेसह 62 कोटी 67 लाख 85 हजार 512 रूपये व खर्चाच्या बाजूस 60 कोटी 58 लाख 94 हजार 708 रूपये असा एकूण 134 कोटी 79 लाख 20 हजार इतका अर्थसंकल्प मांडण्यात आला.
स्टेडियमची भाडेवाढ तसेच तेथे असलेल्या खेळावरील दरवाढ याला विरोधी पक्षनेते सौरभ पाटील यांनी विरोध केला. तसेच सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला असता. स्थायी समितीत स्टेडियमच्या भाडेवाढीचा विषय झालेला नसताना सूचना आलीच कशी यावरून सत्ताधारी जनशक्तीचे नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, हणमंतराव पवार व विजय वाटेगांवकर यांनी नगराध्याक्षा यांना विचारणा केली. तसेच सदरील विषय फेटळाण्याची मागणी सत्ताधारी गटाने केली. सभेत नगरसेवक विनायक पावसकर, फारूख पटवेगार, सौरभ पाटील, राजेंद्रसिंह यादव, हणमंतराव पवार, विजय वाटेगांवकर, गजेंद्र कांबळे यांच्यात उपसूचना व अर्थसंकल्पातील सूचनेवरून गदारोळ झाला. तसेच यावेळी पदाधिकाऱ्यांनी अनेक सूचनावरून प्रशासनाला जाब विचारला.
सौरभ पाटील अर्थसंकल्पावर बोलतना म्हणाले, सत्ताधारी गोंधळलेले तसाच
अर्थसंकल्पही गोंधळलेला आहे. दुर्देवाने अर्थसंकल्पात नविन उत्पन्नाचे कोणतेही साधन किंवा महत्वकांक्षी प्रकल्प नाही. होर्डिंगचे तीन वर्षात थकित भाडे आले नाही तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. गेल्या दोन वर्षात करमणूक कर गोळा केला नाही. शहरातील रस्त्यांवर बेवारस वाहने वर्षोनुवर्षे उभी आहेत, त्यांच्यावर कर आकारण्यात पालिका अपयशी ठरलेली आहे. पालिकेला आलेले निधी शासनाकडे परत जात आहेत. त्यामुळे कराडच्या जनतेचा विश्वासघात केला आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जाॅईन करा
Click Here to Join WhatsApp Group