कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड शहरातील कमानी मारुती मंदीर ते चावडी चौक या दरम्यान मॉर्निंग वॉक करणाऱ्या वयोवृद्ध इसमाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरणाऱ्या २ चोरट्याना कराड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी सदर आरोपींकडून साडेचार तोळे वजनाच्या सोन्याच्या चैनी सह गुन्हा करताना वापरलेली मोपेड मोटार सायकल असा एकुण 3,10,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 15/10/2022 रोजी पहाटेच्या सुमारास कमाणी मारूती मंदीर ते चावडी चौक दरम्यान हॉटेल अनुग्रहच्या समोर रोडवर पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वयोवृद्ध इसमास रस्त्यात खाली पाडून त्याचे गळ्यातील सोन्याची चैन हिसडा मारून जबरी चोरी करून चोरटे फरार झाले होते. या घटनेसंदर्भाने दोन अनोळखी इसमांच्या विरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुरनं 948/22 भादविसक 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल होता.
मा.पोलीस अधीक्षक सातारा श्री.समीर शेख साहेब व मा.अपर पोलीस अधीक्षक सातारा श्री. बापू बांगर साहेब, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड डॉ.श्री.रणजीत पाटील साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून कराड शहरात मॉर्निंग वॉक करीता गेलेल्या इसमाचा चैनस्नॅचिंग गुन्हा उघड करण्याबाबत मार्गदर्शन करून सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने कराड शहर पेालीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक अमित बाबर व त्यांचा स्टाफ सदर गुन्हा उघड करण्याकरीता कामकाज करीत होता.
सदर घटना पहाटे 05.10 वा. सुमारास झालेली होती. चैनस्नॅचिंगचा झालेला प्रकार उघडकीस आणणे हे पोलीसांचेसमोर आव्हान होते. गुन्हा घडलेल्या ठिकाणावरुन संशयीतांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी प्राप्त केले. त्यामध्ये संशयीतांनी चेहरा झाकण्याची व ओळख पटणार नाही याची पुर्ण काळजी घेतली होती त्यावरून त्यांची ओळख पटवणे हे आव्हानात्मक होते. परंतु आरोपींची गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकलच्या वर्णनाच्या आधारे गाडीचा शोध गुन्हे प्रकटीकरण शाखे मार्फत सुरू होता. आरोपींची गुन्हा करतेवेळी वापरलेली मोटार सायकल ही रविवार पेठ व सोमवार पेठ, कृष्णा घाट परिसरात फिरत असल्याची माहिती मिळालेली होती. त्या माहितीच्या आधारे तपास करुन नमुद गुन्ह्यातील दोन आरोपीना मोटार सायकलसह दि.09/11/2022 रोजी अटक केली होती.
सदर आरोपींची पोलीस कस्टडी दरम्यान, या गुन्ह्यातील चैनस्नॅचिंगसह कराड शहरात रविवार पेठ येथील जैनमंदीरा समोर दुसरा एक गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोउपनि श्री. राजू डांगे यांनी आरोपींची कसून चौकशी करून दोन्ही गुन्ह्यातील चोरीस गेलेला साडेचार तोळे वजनाच्या सोन्याच्या चैनी तसेच गुन्हा करताना वापरलेली मोपेड मोटार सायकल असा एकुण 3,10,000/- रुपयाचा मुद्देमाल केलेला आहे. सदर गुन्ह्यांचे तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.राजू डांगे हे करत आहेत.
नमुदची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.समीर शेख, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री. रणजीत पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक श्री. राजू डांगे, सफौ सतीश जाधव, रघुवीर देसाई, नितीन येळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, महेश शिंदे, संतोष लोहार, रईस सय्यद, सोनाली मोहिते यांनी केलेली आहे.
दरम्यान , मॉर्निंग वॉक करता बाहेर पडणाऱ्या इसमांनी मौल्यवान दागिणे वापरू नयेत. तसेच स्वत:चा चेहरा लपवणारे मोटार सायकलस्वार आजूबाजूला फिरत असल्यास योग्य ती सावधगिरी बाळगावी. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास संपर्क करावा असं आवाहन यावेळी पोलिसांनी केलं आहे.