व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ मधून साधला संवाद; कराडातील सफाई कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभरातील नागरिकांशी आज सकाळी 99 व्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी कराड नगरपालिकेच्या सर्व सफाई कर्मचारी, भाजप नेत्यांनी पंतप्रधानांच्या ‘मन कि बात’मध्ये सहभाग घेत त्यांचा कार्यक्रम ऐकला.

कराड येथील बाबुभाई परमसिह हॉलमध्ये पंतप्रधान मोदींचा ‘मन कि बात’ हा कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी एक भारत, श्रेष्ठ भारत यासोबत मृत्यूनंतर मानवी अवयव दान ही काळाची गरज असून त्यामुळे अनेकांना जीवनदान मिळणार आहे, असे सांगितले तसेच सौर ऊर्जेच्या वापराबद्दल सखोल माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी मोठी एलसीडी स्क्रीन देखील लावण्यात आली होती.

यावेळी सातारा जिल्हा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, भाजपा शहराध्यक्ष एकनाथ बागडी, माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, कराड नगरपरिषद मुख्याधिकारी रमाकांत डाके, डॉ. अनिल शहा, डॉ. हेमंत जानुगडे, डॉ. नचिकेत वाचासुंदर, अलंकार हॉटेलचे मालक श्रीदीपक शेठ आरबुने व त्यांचे कर्मचारी कांतीलाल जैन, माजी नगरसेवक सुहास जगताप, रुपेश मुळे, सुनील शिंदे, मुकुंद चरेगावकर, उमेश शिंदे, शंकर पाटील, सरचिटणीस प्रमोद शिंदे, उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, संयोजक नितीन शहा विवेक भोसले, विशाल कुलकर्णी, सौरभ शहा, सुनील नाकोड आदींसह कराड नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.